पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ५६.५७ टक्के मतदान झाले असुन तहसिलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. आता २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूकीच्या मतदानासाठी रविवारी ३० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झाली. पाचोरा तालुक्यातील मतदान प्रक्रिया ही श्री. गो. से. हायस्कूलमध्ये दोन बुथवर पार पडली. या केंद्रात दुपारी १२ वाजेपर्यंत संथ गतीने मतदान सुरू झाले. मात्र दुपारी २ वाजेपासून मतदारांनी मतदान केंद्रासमोर लाईन लावल्या होत्या. सायंकाळी ४ वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर पाचोरा तालुक्यातील १ हजार ९९२ नोंदणीकृत पदवीधर मतदारांपैकी १ हजार १२७ मतदारांनी आपला मतादानाचा हक्क बजावला. सदरील मतदान प्रक्रिया तहसिलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली.
याकामी नायब तहसिलदार रणजित पाटील, नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. बी. भालेराव यांचेसह विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहिले. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पाचोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार विनोद शिंदे, पोलिस काॅन्स्टेबल मुकुंद परदेशी, सचिन पवार, गोपनीय शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल ज्योती बोरसे, होमगार्ड योगेश यवतकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आता दि. २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.