पाचोऱ्यातील जय किरण प्रभाजी स्कुलमध्ये वारकरी वारी उत्साहात

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील जय किरण प्रभाजी न्यु इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये २८ जून रोजी देवशयनी आषाढी एकादशी निमित्त स्कुलच्या सकाळ सत्रातील व दुपार सत्रातील विद्यार्थी व शिक्षकांचा कार्यक्रम लहान – मोठ्या बाळ गोपाळांसोबत एकादशी वारी कार्यक्रम संपन्न केला गेला.

या कार्यक्रमात सर्व लहान – मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी विठू माऊली व वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. छान प्रकारे दिंडी चा कार्यक्रम हा काढण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी सुद्धा या वारीत लेझीम खेळून आनंद घेतला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुळकर्णी, सचिव जीवन जैन, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवानी व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील, स्कूलचे सी. ई. ओ. अतुल चित्ते, पर्यवेक्षिका विद्या थेपडे यांनी सर्व शिक्षक – शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Protected Content