पाचोरा, प्रतिनिधी | कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी एकूण ९२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओमीक्रॉनच्या रूग्णांत दिवसागणिक वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील १५ ते १८ वयोगटातील ९२ विद्यार्थ्यांचे लसीकरण आज करण्यात आले. दरम्यान इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेला होता. त्याअनुषंगाने हे लसीकरण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विकी पाटील व ज्योस्त्ना पाटील यांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण केले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व थोडक्यात सांगुन त्यांना शुभेच्छा दिल्या. लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील तसेच शाळेतील क्रिडा शिक्षक सुशांत जाधव, दिलीप चौधरी, नंदू पाटील व लक्ष्मी पाटील आदींनी परिश्रम घेतले.