पाचोरा प्रतिनिधी । शहरातील विवेकानंद नगरात घराला भगदाड पाडून घरातील ९३ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचे उघडकीला आले. पाचोरा पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, गणेश चिंधू गोसावी (वय-४८) रा. विवेकानंद नगर यांच्या घरात १९ जानेवारी रोजी घर बंद असतांना संशयित आरोपी प्रशांत चिंधू गोसावी याच्यासह अज्ञात तीन जणांनी घराला भगदाड पाडून घरातील ५० हजार रूपये रोख व सोन्या चांदीचे दागिने असा एकुण ९३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. गणेश गोसावी हे घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. गणेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रशांत गोसावीसह अज्ञात तीन जणांविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि विकास पाटील करीत आहे.