आमली पदार्थ सेवन करणाऱ्यावर शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेजवळ प्रतिबंधित असलेला गांजाचे सेवन करणाऱ्या एका तरुणावर शनीपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. या संदर्भात रविवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या मागील घेत जवळ काहीजण प्रतिबंधित असलेला गांजा व आमले पदार्थ सेवन करत असल्याचे गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या.

रविवारी २ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता पथकाने कारवाई करत संशयित आरोपी निखिल घनश्याम सपकाळे (वय-२३, रा.कोल्हे वाडा, जुने जळगाव) यांच्याकडून प्रतिबंधित असलेला गांजा आणि आमली पदार्थ जप्त केले आहे. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल नवनीत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी २ वाजता संशयित आरोपी निखिल घनश्याम सपकाळे यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव हे करीत आहे.

Protected Content