पाचोरा, प्रतिनिधी । शासनाच्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे १२ विद्यार्थी बसले होते. पैकी ६ विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव संस्थेच्यावतीने शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये नुकताच साजरा करण्यात आला.
सदर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा २२ जून २०२१ रोजी सोशल डिस्टंसिंग चे पालन करू शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे साजरा झाला . या कार्यक्रमात मुलांनी आणखी प्रगती करावी, स्पर्धा परीक्षांचा चांगला अभ्यास करावा अशा प्रकारचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष पंडित शिंदे व संस्थेचे सचिव अॅड. जे. डी. काटकर तसेच सहसचिव शिवाजी शिंदे व संचालक नीरज मुनोत यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. मुलांच्या या यशाचे खरे शिल्पकार शिंदे इंटरनॅशनल स्कूल चे प्रा. डॉ. विजय पाटील व स्कूलचे सर्व शिक्षक हे आहेत. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या ह्या कामगिरीवर सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.