पाचोरा प्रतिनिधी । शहरातील मानसिंगा इंडस्ट्रिज लिमीटेड कंपनीतून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ६० हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पाचोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील मानसिंगा मार्केटमध्ये मानसिंगा इंडस्ट्रिज लिमीटेडच्या क्वार्टर्स ८, ११, १३, १४ चे कुलूप तोडून मध्यरात्री ६० हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविली. हा प्रकार २३ जानेवारी रोजी सकाळी ४ ते ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी व्यवस्थापक भवरलाल सुंदरलाल पाल (वय-५१) रा. आनंदनगर खंडवा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपस पोउनि दत्तात्रय नलावडे करीत आहे.