पाचोरा येथील एक्सपोर्ट चॉकलेट तयार करणा-या कारखान्यावर एफ.डी.ए.ची धाड

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील एक्सपोर्ट चॉकलेट तयार करणा-या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकले असता उत्पादन अत्यंत अनारोग्य वातावरणात सुरु असल्याचे आढळून आले असून यावेळी असुरक्षित ब्राऊन शुगर (साखरेचा प्रकार) जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी त्यांना खब-यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मे. जय गुरुदेव इंडस्ट्रीज अॅण्ड वेअर हाऊसिंग, ४७ / १-२, वरखेडी रोड, पाचोरा या ठिकाणी दि. २९ जानेवारी २०२० रोजी धाड टाकली असता सदर आस्थापना ही एक्सपोर्टसाठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी तयार करीत असतांना आढळले. तसेच काही डोमेस्टिक उद्देशासाठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी स्थानिक विक्री करीता उत्पादन करीत असल्याचे आढळले. या ठिकाणी तपासणी अंती आस्थापनेत केंद्रीय अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत परवाना आढळून आला. सदर आस्थापनेत शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरीचे उत्पादन अत्यंत अनारोग्य वातावरणात सुरु असल्याचे आढळले. तसेच शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरीचे उत्पादनाकरीता वापरण्यात येणारा कच्चा माल ‘ब्राऊन शुगर’ (साखरेचा प्रकार) चे ५० कि.ग्रॅ. चे २०० कट्टे अत्यंत अस्वच्छ ठिकाणी साठविलेले आढळले तसेच त्या जवळच धुळ, कचरा व अडगळीचे सामान त्याठिकाणीच आढळले. त्या साठयातून अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी अ.सु.मा.का. अंतर्गत रितसर कच्चा मालातून ब्राऊन शुगर चा नमुना विश्लेषणाकरीता घेवून शिल्लक ३ लाख १० हजार रुपये किंमतीचे २०० कट्टे जप्त केले आहे. सदरचा नमुना विश्लेषणाकरीता अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आला होता. प्राप्त अहवालानुसार पदनिर्देशित अधिकारी यांनी सदरचा अहवाल असुरक्षित घोषित केलेला आहे. सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदयाच्या कलम, नियम व विनियमानुसार पुढील कार्यवाही प्रशासनामार्फत घेण्यात येणार आहे. सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव यो. को. बेंडकुळे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई केलेली आहे.

Protected Content