पाचोरा बसस्थानकात कर्मचाऱ्यांना मोफत होमिओपॅथी औषधाचे वाटप

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील बसस्थानकात काँग्रेस आरोग्य सेवा सेल आणि नित्यसेवा होमीओपॅथीक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे होमीओपॅथीक औषधांचे कर्मचारी व अधिकारी यांना वाटप करण्यात आले.

कोरोना लढाईत एसटी महामंडळाच्या गाड्यांची दुरुस्ती सुरु आहे. यात जवळपास १०० हुन अधिक अधिकारी आणि कर्मचारी या महामंडळाच्या डेपो मध्ये हजेरी लावत आहेत. त्यामुळे पाचोरा शहरात काँग्रेस आरोग्य सेवा सेलतर्फे प्रदेश सरचिटणीस राहुल गांधी, युथ ब्रिगेड महाराष्ट्र प्रभारी सचिन सोमवंशी यांनी गेल्या दोन महिन्यांपासून विविध होमीओपॅथीक क्लिनिक च्या सौजन्याने होमीओपॅथीक गोळ्या मोफत वाटपचे कार्य सुरू केले आहे.

एसटी महामंडळाच्या पाचोरा आगारात होमीओपॅथीक तज्ञ डॉ. सदानंद वाणी यांच्या नवकांर प्लाझा येथील ‘नित्यसेवा होमीओपॅथीक क्लिनिक’ आणि ‘आरोग्य सेवा सेल जळगाव जिल्हा’ यांच्या संयुक्त विद्यमाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, असे होमीओपॅथीक गोळया मोफत वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. सदानंद वाणी, सचिन सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डेपो मॅनेजर देवेंद्र वाणी, एटीस मनोज तिवारी, टिआय सागर फिरके, संभाजी ब्रिगेडचे मुकेश तुपे, जखदीश खिलोशिया, इंटकचे सचिव डीबी महाले, वरीष्ठ लिपीक रविंद्र पाटील, विनोद पाटील, एम.सी. पाटील, जाकीर पटवे, बंटी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतल्या बद्दल आभार व्यक्त केले.

Protected Content