पाचोरा, नंदू शेलकर । पाचोरा अग्रवाल समाजातर्फे आज युवक – युवती परिचय मेळावा शहरातील रामदेव लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात येथील युवक-युवती सहभागी झाले होते.
मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अग्रवाल समाजातर्फे कुठल्याही प्रकारचे युवक – युवती मेळावा समोरासमोर घेण्यात आलेला नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये अग्रवाल समाजातर्फे ऑनलाइन मेळावे अनेक वेळा आयोजित करण्यात आले होते. मात्र त्या मेळाव्यामध्ये फार काही विवाह जुळले नाही. त्यामुळे पाचोरा अग्रवाल समाजाच्या वतीने समोरा – समोर युवक – युवती एकमेकांशी संवाद साधू शकतील जेणेकरून युवक – युवतींना आपल्याला हवं ते जीवनसाथी मिळु शकतील. याच उदात्त हेतुने पाचोरा अग्रवाल समाजातर्फे आज युवक – युवती परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश, गुजरात येथून देखील युवक-युवती परिचय देण्यासाठी आले होते. या मेळाव्यात अनेक युवक युवतींनी सहभाग नोंदवला होता. या परिचय संमेलनात समस्त पाचोरा अग्रवाल समाजाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेत संमेलन यशस्वीरित्या पार पाडले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1536047766730960