पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषीत : शेतकर्‍यांना होणार लाभ

मुं बई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून मान्यता देण्यात आली असून यामुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत होणार आहे.

मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात अनेक निर्णय घेण्यात आले. यातील प्रमुख निर्णय म्हणजे पावसाला राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती म्हणून मान्यता दिली आहे. ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास त्या परिसरामध्ये तातडीने पंचनामे करण्यात येतील. यामुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी हे निकष उपयुक्त ठरणार आहे.

Protected Content