पहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांचे जल्लोषात स्वागत

पहूर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहीत पवार यांचे पहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

पहूर बसस्थानक परिसरात त्यांचे आगमन होताच फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, उपसरपंच श्याम सावळे,  ईश्वर बाबुजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुकाध्यक्ष शैलेश पाटील, रवींद्र मोरे, शरद पांढरे, किरण पाटील, ज्ञानेश्वर करवंदे, डॉ. जितेंद्र घोंगडे, विकास लोढा, आशिष माळी, आसिफ पिंजारी, राजू जंटलमन, बबलू  कोटेचा, प्रविण कुमावत , रामचंद्र चव्हाण , अशोक चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी ‘ड्रायझोन ‘हटवून पहूर गावाचा पोखरा योजनेत समावेश करावा तसेच हिवरी -वडगाव – पिंपळगाव ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा देण्यात यावा , शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा लाभ मिळवून द्यावा आदी मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले .

Protected Content