पहूर , ता.जामनेर, प्रतिनिधी । मानवाधिकार सरंक्षण समिती (नवी दिल्ली) भारत सरकार रजिस्टर उत्तर महाराष्ट्र जनंसपर्क कार्यलयाचे पहूर येथे उद्घाटन मानवअधिकार सरंक्षण समितीचे राष्ट्रीय जनंसपर्क अधिकारी विजय कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उत्तर महाराष्ट्र जनंसपर्क कार्यलयाच्या उदघाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रविण गायकवाड, महाराष्ट्र राज्य जनंसपर्क अधिकारी गजानन भगत , गुलाबराव गायकवाड मंबई जनसंपर्क अधिकारी संताेष पाटील, उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी उत्तर महाराष्ट्र महीला प्रमुख माधुरी उदावन्त , जळगाव जिल्हा कार्यकारणी , जामनेर तालुका कार्यकारणी पदाधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यलयाचे उदघाटन करण्यात आले. विभागातील नागरीकांच्या समस्या या माध्यमातुन समीतीच्या वरिष्ठांपर्यंत पाेहचुन त्या साेडवण्याचा मनापासुन प्रयत्न करणार असल्याचे संताेष पाटील यांनी सांगितले. सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीस संताेष पाटील यांना शुभेच्छा दिल्या.