पहूर येथे कडकडीत बंद (व्हिडिओ )

पहूर , ता.जामनेर रविंद्र लाठे। येथे आतापर्यंत तब्बल ४३ कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यास आळा घालण्यासाठी व संसर्ग वाढू नये म्हणून पहूर पेठ व पहूर कसबे कोवीड १९ समितीने पासून ११ जुलै ते १५ जुलै असे पाच दिवस पहूर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय एकमुखाने घेतला असून जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे.

आज जनतेने स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या या १०० % भरभरून प्रतिसाद मिळत असून पहूर पेठ व पहूर कसबे या दोन्ही गावाच्या प्रवेशद्वारावर मुख्य रस्त्यावर बॅरीकेट, टायर ,लाकूड ,टाकून मुख्य रस्ते सील करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकही आपापल्या घरात बसून असल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे. या बंद कालावधीत काही अनुचित प्रकार किंवा अफवा पसरू नये म्हणून पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे, उपनिरीक्षक अमोल देवडे, शशिकांत पाटील, सानप दादा, ट्रॅफिक हवालदार जीवन परदेशी , पहूर पेठ व पहूर कसबे ग्रामपंचायत कर्मचारी, होमगार्ड आदींनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला. अत्यावश्यक सेवा म्हणून खाजगी दवाखाने, मेडिकल स्टोअर्स ठराविक वेळ सुरू राहणार आहे. या ५ दिवसाच्या बंद दरम्यान, मेडिकल स्टोअर्स सकाळी ९ ते १२ व संध्याकाळी ४ ते ७ तसेच सर्व दवाखाने मात्र चालू राहतील. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना नियमित सेवा पुरविण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. हर्षल चांदा यांनी सांगितले आहे. पाच दिवसीय जनता कर्फ्युला पहूर पेठ व पहूर कसबे आधीच संमती देण्यात आली असुन गावात तोंडाला बिना मास्क फिरू नये व विनाकारण फिरू नये. तरी आपणच आपला रक्षक म्हणून कोरोना आपत्तीच्या वेळे योद्धे म्हणून सहकार्य करावे व लॉकडाउन नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1175264316174239/

 

Protected Content