पहूर येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्री गणेश पुराण कथेस प्रारंभ

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्री गणेश पुराण कथेस प्रारंभ झाला आहे.

श्री गणेश पुराण कथा प्रवक्ता श्री हरिभक्त परायण गजानन महाराज मांडवेकर अध्यक्ष श्री समर्थ काळजी महाराज देवस्थान मांडवे खुर्द ता. जामनेर हे करणार असून सप्ताहात दररोज दुपारी एक ते चार श्री गणेश पुराण कथा वाचन व रात्री साडेआठ ते साडेदहा श्रीहरी कीर्तन असे कार्यक्रम होणार आहे. 27 जानेवारी रोजी ह भ प गजानन महाराज मांडवेकर, दि. 28 जानेवारी शनिवार रोजी हभप पंकज महाराज शहापूर यांचा सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला असून 29 जानेवारी रविवार हभप गायत्रीताई दुसाने कळमसरा, 30 जानेवारी सोमवार हभप प्रल्हाद महाराज कळमसरा, ३१ रोजी हभप नरेंद्र महाराज, १ फेब्रुवारी बुधवार रोजी हभप गौरीताई शिवपुजे पुणे, २ फेब्रुवारी गुरुवार रोजी हभप श्रीराम महाराज मालदाभाडी यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून ३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी हभप अमोल महाराज कासली यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ वाजता आयोजित करण्यात आले असून दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्री गणेश पुराण कथेचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन जागृत देवस्थान श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर पहूर पेठ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content