पहूर, ता. जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूरपेठ येथील दोन वर्षांच्या चिमुकलीसह ७० वर्षांच्या आजीने कोरोनावर विजय मिळविला असून त्या सुखरूपरित्या आपल्या घरी परतल्या आहेत. गावकऱ्यांच्या शुभेच्छा आणि डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न यामुळे चिमुकलीसह आजीने कोरोनावर मात केली आहे .
पहूर पेठ येथील ७० वर्षीय आजीचा औरंगाबाद येथील खाजगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला होता .त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु होते .दरम्यान त्यांच्या कुटुंबातील दोन वर्षांच्या चिमुकलीसह पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते .या सर्वांवर जामनेर येथील कोवीड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले .वैद्यकीय यंत्रणेचे शर्तीचे प्रयत्न आणि गावकऱ्यांच्या शुभेच्छांमुळे २ वर्षांची चिमुकली ,सत्तर वर्षांच्या आजी त्याचबरोबर कुटुंबातील सगळेजण कोरोनावर मात करून आपल्या घरी आले आहेत .त्यांचे गावातून उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे. तसेच पहूर पेठ येथील अन्य चौघांनीही कोरोनाशी संघर्ष करून विजय मिळवला आहे तेही सुखरूप रित्या आपल्या घरी आले आहेत. ‘ दवा ‘ आणि ‘दुवा ‘ यामुळे पहूर पेठ येथील आतापर्यंत एकूण दहा जणांनी कोरोनाला हरविले आहे.