पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी)। येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९८. ६ ८ टक्के लागला असून पहूर केंद्रातून शाळेने प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
पवन राजेंद्र बावस्कर या विद्यार्थ्याने ८८.८० टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक पटकविला आहे. नंदिनी अशोक चव्हाण या विद्यार्थिनीने ८१.८० टक्के गुण घेत द्वितीय क्रमांक मिळवला तर वैभव पुंडलिक वानखेडे व किरण समाधान घोंगडे या विद्यार्थ्यांनी ८०. ८० गुण मिळवित तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. मार्च २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेस सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे ७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकाल जाहीर होताच शाळेतून प्रथम आलेल्या पवन राजेंद्र बावस्कर या विद्यार्थ्यांचा महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती बाबुराव अण्णा घोंगडे, मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. व्ही. घोंगडे , वर्गशिक्षक हरिभाऊ राऊत यांच्या सह शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. तसेच गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम राखल्या बद्दल संस्थेतर्फे अध्यक्ष बाबुराव अण्णा घोंगडे यांनी मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. व्ही. घोंगडे व वर्ग शिक्षक हरिभाऊ राऊत यांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्रीमती के. ए. बनकर, बी. एन. जाधव, सी. एच. सागर, श्रीमती ए. ए. पाटील, श्रीमती पी. आर. वानखेडे, राजेंद्र सोनवणे, अमोल बावस्कर, दिपक पाटील, अजय देशमुख, युनूस तडवी, मनोज खोडपे, शंकर भामेरे, प्रकाश जोशी, सुनिल पवार आदींची उपस्थिती होती.
सर्व गुणवंत विद्याथ्यांचे अभिनंदन होत आहे.