पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | राष्ट्रप्रेमाच्या जागृतीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पहुर गावातून पहिल्यांदाच ७३ मीटर लांबीची तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांनी तिरंगा यात्रेत सहभाग नोंदवित तिरंगा हातात धरुन अत्यंत सन्मानाने सहभाग नोंदविला.
सावित्रीबाई फुले विद्यालयापासुन काढण्यात आलेल्या या तिरंगा पदयात्रेच्या दरम्यान चौका चौकात पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. प्रजासत्ताक दिवसाचे औचित्य साधुन नागरीकांमध्ये राष्ट्रप्रेमाच्या जागृतीसाठी अभाविप पहूर वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन प्रमुख पाहुने एपीआय राकेश परदेशी, व प्रमुख वक्ते मयुर पाटील, अभाविपचे जळगाव जिल्हा संयोजक मनोज जंजाळ, प्राचार्य सी. टी. पाटील ,पहुर गावच्या सरपंच आदि उपस्थित होते. उद्घाटनानंतर हजारो विद्यार्थी व नागरिकानी सहभागी होत . अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष करत ही तिरंगा पदयात्रा सावित्रीबाई फुले विद्यालय पासुन आर. टी. लेले महाविद्यालया पर्यत जल्लोशात आणली. तिरंगा पदयात्रेचे स्वागत गावातील चौका चौकात स्वागत करण्यात आले .गावातील महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरीकांनी राष्ट्रभक्ती जागवित उत्स्फुर्तपणे या तिरंगा पदयात्रेत सहभाग नोंदविला. तिरंगा पदयात्रा नियोजनात अक्षय जाधव ,गौरव तरवाड़े, सचिन पाटील , कल्पेश सोनवणे, रोशन घोंगड़े, विशाल गोरे, महेंद्र घोंगड़े,गौरव गोयर, किशोर बारी कार्यकर्ते होते.