पशुधन अधिकारी अभावी रखडले गुरांचे लसीकरण  

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत अतिदुर्गम क्षेत्रातील गाडऱ्या जामन्या या आदीवासी क्षेत्रातील गाव पाडयांवर गुरांच्या लंपी आजाराचा मोठा शिरकाव झाला असुन या वाढत्या लंपी संसर्गामुळे आदीवासी बांधव भितीग्रस्त झाले आहे. पशुधन अधिकारी या ठिकाणी मिळत नसल्याने त्या ठिकाणाची परिस्थिती अधिक बिकट बनली आहे.

मागील काही दिवसापासुन संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्हा व यावल तालुक्यात देखील लंपी स्किन डिसीज या गुरांच्या संसर्गजन्य गंभीर आजाराचा प्रादुर्भाव सातत्यावे वाढत असुन या अनेक शेतकरी व पशुपालकांची गुरढोर दगावली आहे. या आजारा पासुन गुरांचे रक्षण करण्यासाठी विविध स्तरावर तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातुन लसीकरणाची मोहीम राबविली जात असुन तालुक्यातील गाडऱ्या जामन्या या सातपुडा पर्वताच्या कुशीत अतिदुर्गम क्षेत्रात मात्र मागील आठ दिवसांपासुन ग्रामपंचायत पातळीवर लंपी स्किन डिसीज या आजाराचा सामना करण्यासाठी सुमारे ६ooच्यावर अॅन्टी लंपी लसीकरण मागविण्यात आले असुन त्या ठीकाणी मात्र मागील आठ दिवसापासुन पशुधन अधिकारी मिळत नसल्याने या ठीकाणच्या पाळीव गुरांची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

येत्या एक दोन दिवसात गाडऱ्या जामन्या या ठीकाणी लंप्पी लसीकरणासाठी जर पशुधन चिकीत्सक पहोचले नाही तर त्या गावातील नागरिक सर्व मेलेली गुरढोर ही यावल पंचायत समितीच्या आवारात आणुन टाकणार असल्याची अशी संत्पत प्रतिक्रीया आदीवासी बांधवांनी व्यक्त केली असुन, यासंदर्भात पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील यांनी या विषयी जिल्हा पशुधन अधिकारी एस व्ही सिसोदे यांच्याशी मोबाईलवरून चर्चा करून गाडऱ्या जामन्या या आदीवासी क्षेत्रातील गुरांच्या लंपी प्रादुर्भावा संदर्भातील संपुर्ण माहीती कळवुन परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.

Protected Content