‘खाकी’त डान्स नकोच ! : महासंचालकांनी जारी केले निर्देश

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गणेशोत्सवात अनेक पोलिस कर्मचारी मनसोक्त नाचत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. महासंचालकांनी याची दखल घेऊन कर्मचार्‍यांसाठी निर्देश जारी केले आहेत.

काही दिवसांपूर्वी झालेल्या गणेशोत्सवात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी मनसोक्तपणे नाचतांना दिसून आले होते. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. खरं तर पोलीस कर्मचारी प्रचंड तणावात काम करतात. यातच ते गणेशोत्सवासह अन्य कोणताही सण वा उत्सव ते आपल्या कुटुंबासोबत साजरा करू शकत नाही. यामुळे यंदा कोविडच्या आपत्ती नंतर पहिल्यांदाच खुलेपणाने साजरा झालेल्या गणेशोत्सवात पोलिसांनी ठिकठिकाणी जल्लोषात ठेका धरला होता.

पोलिसांच्या या उत्सवाचे स्वागत करण्यात आले होते. तर काही जणांनी याला नाके देखील मुरडली होती. विशेष करून गणवेशात नाच केल्याने पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला आणि त्याहूनही दरार्‍याला धक्का लागत असल्याचे आरोप देखील सोशल मीडियातून करण्यात आले होते. याची राज्याच्या पोलीस महासंचालकांनी गंभीर दखल घेतली आहे. यापुढे कर्तव्यावर व गणवेशात असतांना सार्वजनीक कार्यक्रमांमध्ये नाचता कामा नये असे निर्देश देण्यात आले आहेत.

Protected Content