मुंबई : वृत्तसंस्था । भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही धक्कादायक आरोप केले आहेत. पवार कुटुंबियांनी अनेक साखर कारखान्यांच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.
साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
रोहित पवार यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याच्या व्यवहारामध्ये घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. या कारखान्याच्या विक्रीदरम्यान किंमत कमी करत रोहित पवारांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. राज्य सहकारी बँकेत पवार कुटुंबाने घोटाळा केल्याचंही सोमय्या म्हणालेत. शिखर बँकेत घोटाळा करुन पवार कुटुंबाने अनेक कारखाने लाटल्याचा घणाघातही सोमय्या यांनी केलाय.
रोहित पवार यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना ज्या पद्धतीने राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करुन गडबड करुन ५० कोटी रुपयांना विकत घेतला. बारामती अॅग्रो साखर कारखाना त्यांनी विकत घेतला. याचा पण तपास व्हायला हवा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा यामध्ये मोठा तोटा झालाय. हा व्यवहार म्हणजे पवार कुटुंबाचा मोठा घोटाळा आहे असा आरोप सोमय्या यांनी केलाय. त्यामुळे या व्यवहारांची चौकशी व्हायला हवी.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळाप्रकरणी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वार शुगर्स या कारखान्याच्या ६६ कोटींची जागा, इमारत आणि यंत्रसामग्री यावर जप्ती आणण्यात आल्याची माहिती ईडीच्या सूत्राकडून देण्यात आली. जरंडेश्वार सहकारी कारखाना २०१० मध्ये लिलावात काढण्यात आला होता. तेव्हा समर्पित किमतीपेक्षा कमी दराने हा कारखान्याचा लिलाव करण्यात आल्याचे ईडीला चौकशीत आढळले होते. यानुसारच ही कारवाई करण्यात आली.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलावात ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने खरेदी के ला होता. या कंपनीने हा कारखाना लगेचच जरंडेश्वार शुगर्स या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला होता. या कं पनीत ‘स्पार्क लिंग सॉईल प्रा. लिमिटेड’ या कंपनीचा मोठा हिस्सा आहे. स्पार्क लिंग कंपनी ही अजित पवार व त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे. जरंडेश्वार कारखाना ताब्यात घेण्यासाठी गुरू कमो़डिंटी या बेनामी कंपनीचा वापर करण्यात आला होता. या कारखान्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ७०० कोटींचे कर्ज घेतल्याचेही ईडीला आढळून आले आहे.