पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही कोरोनाचा हल्ला भयंकर : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) आम्ही आतापर्यंतच्या सर्वात वाईट परिस्थितीचा सामना करत आहोत. कोरोनाचा हल्ला आतापर्यंत सर्वात भयानक हल्ला आहे. पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही भयानक आहे. आतापर्यंत अमेरिकेवर असा हल्ला झालेला नाही, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे.

 

 

कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत तब्बल ७२ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १२ लाखाहून अधिक लोकांना लागण झाली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा उल्लेख करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरसचा हल्ला पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही भयंकर असल्याचे म्हटले आहे. कोरोनामुळे अमेरिकेत लॉकडाउन असून अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. यावेळी अमेरिकेच्या १८ युद्धनौका आणि १८८ लढाऊ विमानं नष्ट झाली होती. तर २४०३ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर ११ सप्टेंबर २००१ रोजी अल कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटवर हल्ला केला होता.

Protected Content