अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सात्री गावाला पर्यायी रस्ता मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी पाडळसरे धरणात जनआंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला जनआंदोलन समितीच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे. यासंदर्भात तक्रारदार महेंद्र बोरसे यांनी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
सात्री गावाला जाण्यासाठी अजूनही रस्ता नसल्याने पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने मागील वर्षी शालेय विध्यार्थिनी यावर्षी पावसाळ्यांत एक महिला यांना वेळेवर उपचार मिळाला नव्हता. यामुळे त्यांना मृत्यूला कवटाळावे लागले होते. शासनाने पर्यायी रस्ता देण्याबाबत सक्रियता दाखवली मात्र अडचणी दूर न झाल्याने तेही तसेच थांबले आहे. पूर परिस्थिती पर्यायी रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने मयताच्या वारसाना मुख्यमंत्री सहायता निधीतून सहायता मिळाली नाही.
पुर्नवसन गावठाण मधील भूखंड वाटप बाबत शासन स्तरावर प्रलंबीत असलेल्या प्रस्तावाला मंजुर मिळत नसल्याने सात्री ग्रामस्थ व्यस्थीत होवून ता.२६ जानेवारी रोजी प्रजाकसत्ता दिनी निम्न तापी प्रकल्प पाडळसेच्या जल साठयात ग्रामस्थांना सोबत घेवून महेंद्र बोरसे हे जल समाधी घेणार . याची दखल घेत पाडळसरे जनआंदोलन समितीने सात्री गावाला पर्यायी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी या आंदोलनाला पाठींबा दिला असून त्याबाबत तहसीलदार यांना आज ता.24 रोजी तसे पत्र दिले आहे