फैजपूर येथे सत्यजित तांबे यांच्या प्रचारार्थ मेळावा

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सत्यजित तांबे यांचा शहरात प्रचारार्थ मेळावा आयोजन करण्यात आले होते. शहरातील खंडेराव वाडी देवस्थान येथे बुधवारी २५ जानेवारी रोजी नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शहरातील परिसरातील पदवीधर मतदारांसाठी ही बैठक घेण्यात आली.

….तर व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी उपस्थित असते: सत्यजित तांबे
नाशिक पदवीधर मतदारसंघात नवीन नवीन घडामोडी बघायला मिळत आहे. यातच नाशिक पदवीधर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी सांगितले की गेल्या सात ते आठ दिवसात अनेक राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या आम्हाला व थोरात घराण्याला घरातून बाहेर ढकलण्याचे काम करण्यात आले अन्यथा धनंजय चौधरी यांच्या ठिकाणी आमदार शिरीष चौधरी यांची व्यासपीठावर उपस्थिती असती असे विधान सत्यजित तांबे यांनी केले. एकीकडे महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शुभांगी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे, मात्र दुसरीकडे रावेर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी व मधुस्नेह परिवार हे अपक्ष उमेदवार सत्यजित तांब्यांच्या प्रचार मेळाव्याच्या व्यासपीठावर दिसून आले. इतकेच काय तर काँग्रेसचे कार्यकर्ते धनंजय चौधरी यांच्या हस्ते अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

Protected Content