पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या ; शिवाजीनगरवासीयांची मागणी (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवाजीनगर भागातून अवजड वाहने, एसटी महामंडळाच्या बसेस यांचा वापर सुरू झाल्याने छोटे-मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मोठ्या जड वाहनांना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा व क्रांती चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात या मागण्यांसाठी शिवाजीनगर मधील रहिवाश्यानी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

निवेदनाचा आशय असा की, मागील एक वर्षापासून शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याने त्या ठिकाणाहून वाहतुकीस परवानगी नव्हती. त्यामुळे सर्व वाहनधारक फेडरेशन मार्ग शिवाजी महाराजांचा पुतळा मार्ग अमर चौक ते स्मशानभूमी अशा मार्गाने वापरत होते. परंतु, आता शिवाजी महाराज पुतळ्याजवळील रस्ता पुढच्या बांधकामासाठी बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मोठे अवजड वाहनधारक, महामंडळाची एसटी बसेस आणि छोटी-मोठी वाहनेही शिवाजीनगरमध्ये गल्ली बोळामधून सर्सासपणे वापरतात. आता सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे. या अवजड वाहनांचे वापरामुळे शिवाजीनगर परिसरातील प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहतूक जाम झाल्यास शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यातच एखाद्या वेळेस लहान-मोठे वाहनधारकांना मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. एखाद्या वेळेस अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण राहील ? असा प्रश्न उपस्थतीत केला आहे. शिवाजीनगरमधील मुख्य चौक म्हणजे क्रांती चौकामध्ये वाहतूक शाखेचे दोन ते तीन पोलीस नेमण्यात यावेत अशी विनंती करण्या आली याप्रसंगी नगरसेवक नवनाथ दारकुंडे सामाजिक कार्यकर्ते अमोल कोल्हे भगवान सोनवणे, गणेश सोनवणे, सचिन महाजन, जयेश नाईकर, संजय सांगळे, राजू सपकाळे, ललित वारे, जाकीर जब्बार खान, दिलीप नाझरकर आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content