पद्मालय येथे अंगारक चतुर्थीनिमित्ताने महापूजा

एरंडोल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पद्मालय येथील गणपती मंदिरात अंगारक चतुर्थी अर्थात मंगळी चतुर्थीनिमित्त सकाळी चार वाजता ब्रह्म मुहूर्तावर जिल्हा वन अधिकारी विवेक होशिंग यांनी सपत्नीक महापूजा केली. ही महापूजा अमळनेरचे केशवराव पुराणिक यांच्या ब्राह्मोचाराने करण्यात आली.

 

या महापूजेनंतर पाच वाजेपासून मंदिर दर्शनासाठी भाविकांना उघडण्यात आले.सकाळपासून उन्हाची तीव्रता असल्याने कै. संतोष परशुराम पाथरवट यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर संतोष पाथरवट (हनुमंत खेडे) यांच्याकडून पाण्याचे जार व लिंबू सरबत भाविकांना वाटप करण्यात आले. पोलीस बंदोबस्त पीआय ज्ञानेश्वर जाधव, एपीआय श्री बागल यांच्या मार्गदर्शनाने तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या मार्गदर्शन लाभले. महावितरण मार्फत विजेचे व्यवस्थापन चांगले लाभले. एसटी महामंडळ मार्फत बस सेवा, वैद्यकीय सेवा, रिंगणगाव आरोग्य केंद्र, कासोदा तळई व सर्व स्टाफ यांचे सहकार्य लाभले. आरोग्य सेवा डॉ. पी. जी. पिंगळे (कासोदा) व डॉ. कोल्हे (नाशिक) यांच्यामार्फत ही वैद्यकीय सेवा सलग ३१ वर्षापासून सुरू आहे. पूना गाडगीळ अँड सन्स व सार्वजनिक बांधकाम उपविभाग एरंडोल यांच्यातर्फे थंड पाणी वाटप करण्यात आले. संपूर्ण विश्वस्त मंडळ व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. भाविकांसाठी दर्शनबारी, स्वयंसेवक, जनरेटर, ॲम्बुलन्स, अग्निशामक दल यांचे नियोजन व्यवस्थित होते. जवळपास ८० हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

Protected Content