चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रहिपूरी गावात पत्र्याच्या शेडला अचानक आग लागल्याने आगीत संसारोपयोगी वस्तू व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवा घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील रहिपूरी येथे रघुनाथ बाबुलाल मोरे वय २८ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार ८ मार्च रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या घराच्या पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली. ही आग कश्यामुळे लागली ही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याचे घटना घडली. यात साहित्य, भांडे, कपडे, कागदपत्रे, धान्य याचे नुकसान झालं आहे. तसेच मंदीरासाठी लागणारे २० हजारा रोख रक्कम देखील जळून राख झाली आहे. याप्रकरणी शनिवारी ९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता मेहुणबारे पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अशोक राठोड हे करीत आहे.