पतीस आत्महत्येस प्रवृत्त; पत्नी व प्रियकराविरुद्ध गुन्हा!

जामनेर,प्रतिनिधी| तालुक्यातील गोद्री येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली असून पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील गोद्री येथील युनुस वजीर तडवी (वय३४) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीला आली. युनुस वजीर तडवी याचा मृतदेह घरासमोरील ओट्यावर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान आई रेशमाबाई वजीर तडवी यांनी पहूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा  युनुस वजीर तडवी यांच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने या संबंधाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे आई रेशमाबाई वजीर तडवी यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस स्थानकात पत्नी व प्रियकरांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे हे करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content