जळगाव, प्रतिनिधी । पंतप्रधान स्वनिधी योजना सर्वक्षणासाठी यादी संगणकावर ऑनलाइन तपासणी केली असता जळगाव शहराची तालुक्यातील नावांचा उल्लेख नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत संघर्ष दिव्यांग बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
पंतप्रधान स्वाभिमानी योजना २०२० योजनेंतर्गत अर्बन लोकल बॉडीने दिलेल्या क्रमांकानुसार नाव शोधतांना जळगाव शहर किंवा तालुक्याचे नाव पोर्टलपवर दिसून येत नाही. तथापि यावेळी सावदा, फैजपूर, रावेर ,चोपडा अशी तालुक्याची नावे दिसतात . मात्र जळगावचे नाव दिसत नाही. जळगाव शहरातील फेरीवाले, भाजीपाला व्यवसाय करणारे व इतर रस्त्याच्याकडेला व्यवसायिक यांना पंतप्रधान स्वनिधी योजना २०२० या योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे लागणारे सहकार्य अथवा कर्तव्यपूर्ती जळगाव शहर महापालिका व संबंधित विभागाकडून केली जात नाही त्यामुळे पंतप्रधान स्वनिधी योजनाच्या कामात अडथळे निर्माण होत आहे. १ जुलै २०२० पासून सुरू झालेले पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत आज पावेतो ४ ऑगस्टपर्यंत समाधानकारक काम झालेले याकडे आपण स्वतः लक्ष द्यावे अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष पाटील यांनी केली आहे