मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान किसान योजनेतील विलंबावरून महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान हे फक्त घोषणा बहाद्दर असल्याची टीका केली आहे.
देशातील पाच कोटींहून अधिक शेतकर्यांना पंतप्रधान किसान योजनेतील दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही व अडीच कोटी शेतकर्यांना तर दुसर्या हप्त्याची रक्कमही आजतागायत मिळालेली नसल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. यावरूनच महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्वीटरवर पोस्ट करत म्हंटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त घोषणाबहाद्दर आहेत. त्यांनी केलेल्या घोषणा फक्त टिव्ही आणि वर्तमानपत्रात बातम्या येण्यासाठी असतात, अंमलबजावणीसाठी नाही. त्यांच्या घोषणांचा लाभ त्यांच्या प्रसिद्धीशिवाय इतर कोणालाही होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे थोरात म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त घोषणाबहाद्दर आहेत. त्यांनी केलेल्या घोषणा फक्त टिव्ही आणि वर्तमानपत्रात बातम्या येण्यासाठी असतात, अंमलबजावणीसाठी नाही. त्यांच्या घोषणांचा लाभ त्यांच्या प्रसिद्धीशिवाय इतर कोणालाही होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. pic.twitter.com/VU2qEs7bDW
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 6, 2020