सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना थकीत हप्ते त्वरित वितरीत करण्यात यावेत अशी मागणी माजी नगरसेवक फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सावदा नगरपरिषदेचे २ प्रकल्प अहवाल मंजूर झालेले आहेत. या लाभार्थ्यांना राज्यशासनाचे संपूर्ण हप्ते मिळाले असून केंद्र शासनाचे हप्ते अद्याप पावेतो प्रलंबीत आहे. परिणामी बहुतांश लाभार्थ्यांचे काम हे निधी अभावी रखडले आहे. त्यांच्या बांधकामात सातत्य राहत नसून ठेकेदारांकडुन वारंवार पैसेची मागणी होत असते. निधी अभावी घरकुलाचे काम पुर्ण होण्यास विलंब लागत असल्याने लाभार्थ्यांचे राहण्याची गैरसोय होत आहे. तरी आपल्या स्तरावर सदर बाबींचा पाठपुरावा करुन थकीत हप्ते लाभार्थ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी केली आहे. निवेदनावर माजी नगरसेवक फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण, रईसाबी मुसा तडवी, सै. हसन सै. अलाउद्दीन, जोहदा बी शे सेनोद्दिन, जुबेदा बी नूरखा तडवी, सचिन चोडके, अनिल अहुजा, सावदा नगरपालिका पीएम प्रकल्प अधिकारी विनय खक्के आदींची स्वाक्षरी आहे.