जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर व तेरापंत युवक परिषद भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने “रक्तदान शिबराचे” आयोजन करण्यात आले होते.
भुसावळ भाजपा तर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसा निमित्त “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येत असुन या अंतर्गत तेरापंथ भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील रक्तदान शिबिराचे उद्घाटन भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच खासदार रक्षाताई खडसे यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. रक्तदान शिबिरास प्रांताधिकारी रामसिंग सुलाने व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे राहुल गायकवाड यांनी विशेष भेट दिली.
सदरील रक्तदान शिबिरास भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोबतच तेरापंत युवक परिषदेचे पदाधिकारी, सदस्यांनी व परिसरातील नागरिकांनी सदरील शिबिरात मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. यावेळी सपत्नीक रक्तदान करणाऱ्या दांपत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, गिरीश महाजन, सतीश सपकाळे,अजय नागराणी,लक्ष्मण सोयांके, बापु महाजन, युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, अलका शेळके, प्रशांत निकम, धनराज बाविस्कर, राहुल तायडे, शंकर शेळके,कैलास झोपे ,प्रा.विलास अवचार, जितेंद्र कोळी, सुनील महाजन, सदानंद उन्हाळे, संजय बोचरे, नंदकिशोर बडगुजर, गोपी सिंह राजपूत यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या आयोजनास तेरापंथ युवक परिषदचे अध्यक्ष देवेंद्र निमाणी, मंत्री अभय छाजेड़, अंकुश चोरडिया, जय निमानी , क्रिश कोठारी, यश कोठारी, रिषि चोरडिया ,पंकज छाजेड ,प्रितेश छाजेड , सोमेश सांखला ,संजय चोरडिया, प्रमोद छाजेड , अमित निमाणी ,गणेश चोरडिया आदींनी विशेष मेहनत घेतली.
सदरील शिबिरास डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे सहकार्य लाभले.