पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे चीनच्या षडयंत्राला खतपाणी घातले जाता कामा नये : मनमोहनसिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपला देश आज इतिहासाच्या नाजूक टप्प्यावर उभा आहे. आपल्या सरकारने आज घेतलेले निर्णय आणि पावले भावी पिढ्या आपले आकलन कशाप्रकारे करतील, हे निश्चित करतील. पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे चीनच्या षडयंत्राला खतपाणी घातले जाता कामा नये, असा महत्त्वाचा सल्ला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारला दिला आहे.

 

मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. त्यात मनमोहनसिंग यांनी म्हटलेय की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या शब्दांची निवड सावधानतेने करावी असा सल्ला दिला आहे. मनमोहन सिंगांनी म्हटले आहे की, 15-16 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या 20 लढवय्या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. या सैनिकांनी साहसाने कर्तव्य पार पाडले. देशाच्या या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा केली. त्यासाठी आम्ही जवानांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे कृतज्ञ आहोत. त्याचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. देशाच्या नेतृत्त्व करणाऱ्यांच्या खांद्यावर कर्तव्य पार पाडण्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्यासारख्या लोकशाही देशात या सगळ्यासाठी पंतप्रधान उत्तरदायी असतात. त्यामुळे आपली वक्तव्य किंवा घोषणांमुळे देशाच्या सामरिक किंवा भूप्रदेशीय हितसंबंधांवर पडणाऱ्या प्रभावाविषयी पंतप्रधानांनी अत्यंत सजग राहिले पाहिजे, असे मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.

Protected Content