Home राजकीय मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले देशाच्या हिताचे : राहुल गांधी

मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले देशाच्या हिताचे : राहुल गांधी

0
103


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत. त्यामुळे मी आशा करतो की, पंतप्रधान मोदी विनम्रतेने हे सल्ले स्वीकारतील, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलेला सल्ला नरेंद्र मोदी यांनी विनम्रतेने मानावा, अशी अपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत. त्यामुळे मी आशा करतो की, पंतप्रधान मोदी विनम्रतेने हे सल्ले स्वीकारतील, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. दरम्यान, लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी मोदी सरकारला अनेक महत्वपूर्ण सल्ले दिले आहेत.


Protected Content

Play sound