मुंबई : वृत्तसंस्था । पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर आणि सिनिअर मॅनेजरच्या ५३५ पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार पीएनबी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. pnbindia.in हे बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. अर्ज करण्याची मुदत २९ सप्टेंबर रोजी संपली होती. मात्र मुदतवाढ देण्यात आली आहे.
पदांची माहिती – मॅनेजर (रिस्क) – १६० पदे, मॅनेजर (क्रेडिट) – २०० पदे, मॅनेजर (ट्रेझरी) – ३० पदे, मॅनेजर (लॉ) – २५ पदे, मॅनेजर (आर्किटेक्ट) – 2 पदे, मॅनेजर (सिविल) – ८ पदे, मॅनेजर (इकोनॉमिक) – १० पदे, मॅनेजर (एचआर) – १० पदे, सीनियर मॅनेजर (रिस्क) – ४० पदे, सीनियर मॅनेजर (क्रेडिट) – ५० पदे, एकूण – ५३५ पदे आहेत
वेगवेगळ्या पदांची पात्रतादेखील स्वतंत्रपणे मागितली आहे. व्यवस्थापकांसाठी किमान वय २५ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे आहे. त्याच वेळी, वरिष्ठ व्यवस्थापकांसाठी किमान वय २५ वर्षे आणि जास्तीत जास्त ३७ वर्षे आहे. राखीव वर्गासाठी कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत असेल.
महत्वाच्या तारखा- ऑनलाइन अर्जांना सुरुवात – ८ सप्टेंबर , ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – ६ ऑक्टोबर , अर्जात सुधारणा करण्याची अंतिम मुदत – २९ सप्टेंबर , ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत – २९ सप्टेंबर , अर्ज प्रिंट करण्याची अंतिम मुदत – १४ ऑक्टोबर आहे . एससी, एसटी आणि दिव्यांगसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये आहे. इतर सर्वांना ८५० रुपये शुल्क भरावे लागेल.
या पदांवर पात्र उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये लेखी परीक्षा अपेक्षित आहे.