न्यायालयाच्या वारंटनंतर हजर न होणाऱ्या प्रौढाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जुगाराच्या दाखल गुन्ह्यामध्ये न्यायालयात हजर न होणाऱ्या संशयित आरोपीवर कायदेशीर अटकेस प्रतिबंध केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर सिताराम चौधरी (वय-४४) रा. सम्राट कॉलनी, जळगाव असे संस्थेत आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सम्राट कॉलनीत संशयित आरोपी शंकर सिताराम चौधरी (वय-४४) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने संशयित आरोपी शंकर चौधरी याला बंधपत्रावर सोडले होते. तसेच त्यानंतर न्यायालयात हजर राहण्यासाठी न्यायालयाने यापूर्वी समन्स, वॉरंट आणि पकड वॉरंट काढले होते. तरी देखील संशयित आरोपी न्यायालयात हजर राहत नव्हता. त्यामुळे जामिनाच्या व बंधपत्राचा भंग करून न्यायालयाचे फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संशयित आरोपी शंकर सिताराम चौधरी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कायदेशीर अटकेस प्रतिबंध करण्याच्या कलमाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश बागुल करीत आहे.

Protected Content