न्यायालयाच्या आवारात तरूणीचा विनयभंग; जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील न्यायालयात एका २३ वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता एकावर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात २३ वर्षीय तरूणी ही आपल्या  परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २१ मार्च रोजी जामनेर न्यायालयात त्यांचे काम आल्याने त्या दुपारी ३ वाजता आलेल्या होत्या. दरम्यान, जितेंद्र कैलास कुमावर रा. नेरी दिगर ता. जामनेर याने तरूणीसह तिच्या सोबत असलेल्या एकाला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला आणि तरूणीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार जामनेर न्यायालयाच्या आवारातच घडला आहे. हा प्रकार घडल्यानंतर तरूणीने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी जितेंद्र कैलास कुमावत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजू तडवी करीत आहे.

Protected Content