जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयात नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून ९ जणांची ९ लाखात फसवणूक करणा-या मंगेश दंगल बोरसे याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याल सुनावणीअंती दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस दलाल योगेश पाटील याचाही पोलीस शोध घेत असून याप्रकरणात आणखी किती जणांचा समावेश आहे, याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता फसवणूक झालेल्यांची संख्याही वाढत आहे. दरम्यान, सोमवारी अटक करण्यात आलेल्या मंगश बोरसे याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक किशोर पवार करीत आहेत.