नेमबाजी स्पर्धेमध्ये निखिल सपकाळे याला सुवर्णपदक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथे होत असलेल्या श्री भीष्मराज बाम मेमोरियल शूटिंग रेंजच्या चौथ्या एक्सेल कप ओपन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये एकलव्य शूटिंग अकॅडमीच्या खेळाडू निखिल धुडकू सपकाळे याने १७वर्ष वयोगटातील पीप साईट एअर रायफल या क्रीडा प्रकारांमध्ये ४०० पैकी ३९२ सर्वाधिक गुण प्राप्त करत सुवर्णपदक प्राप्त केले.

 

निखिल हा पीप साईट एअर रायफल या क्रीडा प्रकारामध्ये प्रथमच सहभागी झाला होता. त्याने अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी करत सुवर्ण यश प्राप्त केले निखिलला एकलव्य शूटिंग अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सागर सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. निखिल हा नगरसेवक श्री धुडकू सपकाळे यांचा चिरंजीव आहे निखिलच्या या यशाबद्दल एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकृष्ण बेलूरकर तसेच त्याच्या शाळेचे शिक्षक वृंद या सर्वांतर्फे निखिलचे कौतुक करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Protected Content