जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात मेजर ध्यानचंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी क्रीडा दिनाविषयी माहिती देण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी.देशमुख यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. याप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. एन.जे.पाटील, प्रा.डॉ.एस.ए.गायकवाड, प्रा.डॉ.पी.बी.देशमुख , प्रा.राहुल संदनशिव, क्रीडा संचालक सुभाष वानखेडे, क्रीडा सहाय्यक वसंत पाटील, व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सुभाष वानखेडे यांनी क्रीडा दिन का साजरा केला जातो, मेजर ध्यानचंद यांचे क्रीडा विकासात योगदान तसेच आजची क्रीडा क्षेत्रातील स्थिती याविषयी सविस्तर माहिती दिली. खेळाडूंना सुविधा पुरविल्यास चांगले व गुणवान खेळाडू देशाला मिळतील असेही ते म्हणाले.