नूतन मराठा महाविद्यालयात दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नूतन मराठा महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय हिंदी व मराठी परिषद आयोजित करण्यात आले. पहिल्या दिवशी मंगळवारी २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

प्रसंगी मंचावर महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकॅडमी सदस्य डॉ. सुनील कुलकर्णी, डॉ. पुरुषोत्तम पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, अमोल पाटील, संस्थेचे संचालक महेंद्र भोइटे, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, डॉ. राहुल संदनशीव, प्राध्यापिका ललिता हिंगोनेकर,डॉ. विजय प्रकाश शर्मा उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करून परिषदेचे उदघाटन करण्यात आले. प्रस्तावनेतून परिषद घेण्यामागील भूमिका प्रा.डॉ.अविनाश बडगुजर यांनी सांगितली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य एल.पी. देशमुख यांनी, साहित्यात समाज घडविण्याचे सामर्थ्य असते. त्यासोबतच साहित्यिक देखील अजरामर होत असतात. म्हणूनच अशिक्षित महिला असतानाही कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव विश्वविद्यालयाला देण्यात आलं आहे, असेही त्यांनी सांगितले.

उदघाटनानंतर डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन यांनी बीजभाषण केले. ज्यात समाजाच्या हितासहित गोष्टींचा विचार केला जातो ते अस्सल साहित्य. ज्यात स्थायीमुल्य आहेत ते शास्वत साहित्य. देशातील शिक्षकानी सजग राहिले पाहिजे. एक चाणक्य चंद्रगुप्त मौर्य सारखा सम्राट निर्माण करु शकतो, तेव्हा आपल्यासारख्या हजारो शिक्षकांच्या शिकवणीतून लाखो चंद्रगुप्त मौर्य सारखे विद्यार्थी घडू शकतात, असे डॉ. बिसेन यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ आफाक शेख यांनी सुत्रसंचलन केले. तर आभार डॉ. राहुल संदानशिव, प्रा सुनील पाटील यांनी मानले.

Protected Content