फैजपूर येथे श्री हनुमान जन्मोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी – शहरातील श्री हनुमान जन्मोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी वैभव वाकरे, उपाध्यक्षपदी तुषार किरंगे यांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

६ एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने यंदाचा हनुमान जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने ५ एप्रिल रोजी दुपारी ५ ते रात्री ९ वाजेदरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय ६ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता अभिषेक व महाआरती ठेवण्यात आली आहे. सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत त्रिवेणी खंडेराव वाडी येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी हनुमान जन्मोत्सव समिती, साईबाबा मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी परिश्रम घेत आहे. यावेळी श्री हनुमान जन्मोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी वैभव वकारे, उपाध्यक्ष तुषार किरंगे, खजिनदार अक्षयसिंह परदेशी, सचिव दिपक कपले, सदस्य यशपालसिंह वर्मा, सदस्य गणेश परदेशी आदींचा समावेश करण्यात आला आहे.

निवड करण्याप्रसंगी विनोद कपले, विक्की काकडे, गुणवंत तेली, प्रभु वर्मा, मनोज परदेशी, बापू संनसे, भूषण कोळी, ललित परदेशी, चंदन कोळी, ऋषी वकारे, अजिंक्य भारंबे, करण परदेशी, लोकेश वाघ, दिपक कोळी, उदय पाटील,यश वाढे उपस्थित होते.

Protected Content