Home Cities जळगाव नूतन भावना मंडळाचे पदग्रहण

नूतन भावना मंडळाचे पदग्रहण

0
28

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नूतन भावना मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला.

या कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्षा रंजन शहा यांनी मोना मोमाया यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर उपाध्यक्षा म्हणून कल्पना शहा यांची निवड करण्यात आली. या वेळी पर्यावरणावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. समता, बंधुता, एकतेचा संदेश या नाटिकेद्वारे देण्यात आला. यानंतर स्पर्धा घेण्यात आली. यात रचना शहा, हरिबेन गुटका, हर्षा वोरा, मधुमोता विजयी ठरल्या. या वेळी हेमा शाह, मंजुळा ओसवाल, टिना पोलडिया आदी उपस्थित होत्या.

नूमत भावना मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष रंजन शहा, उपाध्यक्ष कल्पना शहा, कोषाध्यक्षा प्रीती सतरा, कुसुम केनिया, कार्यकारिणी सदस्य म्हणून भारती शहा, चेतना सतरा, शिल्पा छेडा, भारती लोडाया यांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound