नाहाटा महाविद्यालयात भूगोल सप्ताहाची सांगता

भुसावळ प्रतिनिधी । येथील नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात भूगोल सप्ताहाची सांगता करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. एस.एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी प्रा.पाटील म्हणाले की, भौगोलिक ज्ञान व पर्यावरण संवर्धन या विषयाचा सूर्यमालेच्या भूगोलाशी अतिशय जवळचा संबंध आहे. सूर्यमालेतील सर्व ग्रहांची माहिती भूगोलाच्या अभ्यासात करावी लागते. सर्व विषयाची जननी केवळ भूगोलच असल्याचे त्यांनी सांगितले. उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, जी.जी.खडसे, प्रा.डॉ.एस.एन.पाटील, प्रा.डॉ.सचिन येवले, प्रा.एन.एन.झोपे, प्रा. चंद्रकांत सरोदे, प्रा.डॉ.उमेश फेगडे, प्रा.सचिन कोलते, प्रा.शंकर पाटील, प्रा.पुरुषोत्तम महाजन, प्रा. समाधान पाटील, प्रा.महेश सरोदे, भूगोल सप्ताह सहसमन्वयक प्रा. अजय तायडे उपस्थित होते. सप्ताहनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे बक्षिस वितरण यावेळी करण्यात आले.

Add Comment

Protected Content