नीट परिक्षेत सिध्दी चौधरीचे यश

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्री येथील सिध्दी चौधरी या विद्यार्थीनीने नीट २०२२च्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील नांद्री येथील रहिवाशी व जिल्हा परिषद शाळा खौशीचे मुख्याध्यापक हिंमत चौधरी व जि.प.शाळा मंगरुळ येथील विद्यार्थी प्रिय शिक्षिका निलम चौधरी मॅडम यांच्या सुकन्या सिध्दी हिने नीट २०२२च्या परीक्षेत ७२० गुण पैकी ६०९ गुण मिळवून गौरवास्पद व घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल डॉ.सिद्धी चौधरीचे सर्वत्र कौतुक होऊन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तिने कोरोना काळात बराच काळ घरून अभ्यास केला होता व त्यानंतर राजस्थान मधील कोटा येथे क्लास केला होता. आता तिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयतून एम बी बी एस करून गोरगरिबांच्या सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तिला या यशासाठी तिचे शिक्षकवृंद व आई वडिल व भाऊ व सर्व परिवाराचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content