निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

 

जळगाव : प्रतिनिधी । जीवनाचा सार साध्या व बोली भाषेत मांडणाऱ्या निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त शहर आणि जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी बहिणाबाईंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाबाई ब्रिगेड तर्फे बहिणाबाई उद्यान जळगाव येथे बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यास जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, बहिणाबाई बिग्रेड प्रदेशाध्यक्ष माजी महापौर आशाताई कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती

रविंद्र भैय्या पाटील म्हणाले बहिणाबाई चौधरी यांचे काव्य ग्रामिण भाषेत असल्या मुळे सर्वसाधारण व्यक्तीला सुद्धा त्याचा अर्थ कळतो अतिशय समर्पक असे बहिणाबाई यांचे काव्य आहे ज्यातून त्यांनी जीवनातील चढ उतार, सण उत्सव यांचे वर्णन केले आहे

रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी अतिशय सोप्या सरळ भाषेतून जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे काव्य रचले आहे त्यांच्या काव्यातून आपली मातृभाषा जिवंत होते. शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग – या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार , शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत ज्यातून आपली ग्रामिण भागातील रूढी परंपरा यांची माहिती पुढच्या पिढीला होत राहते विविध काव्य रचनांमधून एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.

आसोदा येथील बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकाचे काम अपूर्णा अवस्थेत असून प्रदीप भोळे ,किशोर चौधरी हे त्यासाठी पाठपुरावा करत आहेत त्याला निधी मिळावा यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारक समिती सदस्य यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार ,खा सुप्रिया सुळे यांचेकडे पाठपुरावा करून काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले

यावेळी आसोदा येथील संतोष साळवे यांना राष्ट्रीय कालिदास शिल्पकला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला

याप्रसंगी अखिल भारतीय लेवा युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप भोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, राष्ट्रवादी माजी महानगर अध्यक्ष परेश कोल्हे, अशोक लाडवंजारी , अजय बढे ,पांडुरंग नाफडे ,सुदाम पाटील अखिल चौधरी, सुनिता येवले, साधना लोखंडे, हर्षा बोरोले, अतुल महाजन, निखिल रडे , हर्षल चौधरी, कार्तिक तळेले ,धिरज पाटील, विवेक जावळे, सुरेश फालक, अविनाश भोळे उपस्थित होते

Protected Content