जळगाव प्रतिनिधी | येथील आयोध्या नगर परिसरातील कौतिक नगर मधील रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याची तक्रार महिलांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याच वेळी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी जिल्हा पूरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून .त्या’दुकानदारावर कारवाईची मागणी केली.
निवेदनाचा आशय असा की, जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत दुकान नंबर २ या स्वस्त धान्य दुकानात नेहमी रेशनकार्डधारकांना धान्याचा पुरवठा खराब होत असतो. गोरगरिबांनी हे धान्य कसे खायचे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. गहू व तांदूळ दोघांचा दर्जा अत्यंत खराब असून खाण्यास अयोग्य आहे. नोव्हेंबर महिन्यातील मोफत कोटा शिधापत्रिकाधारकांना अद्यापही मिळालेला नसून तो देखील त्वरित देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच रेशन दुकानदार महिलांशी अरेरावीची भाषा करतो असे देखील तक्रार या महिलांनी केली आहे. यंदार्भातील तक्रार हेमंगी चौधरी, सुशिलाबाई पाटील, तुळसाबाई अलकरी, छायाबाई पाटील, कमल चौधरी, आशाबाई पवार, वैशाली भावसार, सुमित्रा राजपूत, मनीषा दुसाने, सरला वाडीले, कल्पना गळवे, कल्पना भावसार, सुनंदाबाई पाटील, शारदा राजपूत आदी महिलांनी केली आहे.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी ई-मेलद्वारे अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्री ना. छगन भुजबळ, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, व जळगाव तालुका तहसीलदार यांना तक्रार केली आहे. यात त्यांनी औद्योगिक वसाहत २ स्वस्त धान्य दुकान नं. ९७, आयोध्या नगर येथील क्रांती महिला उद्योग सोसायटी या दुकानाचा परवाना आधीच रद्द करण्यात आला असून तो कायम स्वरुपात रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/970753227154454