नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींच्या फाशीची तारीख आणि वेळ निश्चित झाली आहे. त्यानुसार चारही दोषींना ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे.
दोषी मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार (३१) अशी या दोषींची नावं आहेत. आपल्याकडे अजूनही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचा दावा दोषींचे वकील ए पी सिंह यांनी केलाय. दोषींच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, अक्षयसाठी ते नवी दया याचिका करणार आहेत. पवनकडेही क्युरेटीव्ह पिटिशन आणि राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. नियमानुसार, कोणत्याही एका प्रकरणी दोषींना वेगवेगळी फाशी दिली जात नाही. जोपर्यंत सर्व दोषींच्या याचिकांवर सुनावणी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही आरोपींना फाशी दिली जात नाही. या नियमानुसार आता आरोपींना एकत्र फाशी दिली जाणार आहे.