रावेर : प्रतिनिधी । निरुळ (ता रावेर) येथे पोटच्या मुलाने आईचे तब्बल पन्नास हजाराचे दागीणे चोरल्याची घटना घडली होती.या गुन्हात रावेर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत मुलाला अटक केली आहे.
निरूळ येथील सयाबाई खैरे या त्यांच्या पती व मुलासह राहतात दि १५ रोजी रात्री त्यांच्या घरात चोरी झाली यात 20,000/- रुपये रोख, एक 7 ग्रॅम सोन्याची अंगठी, 50 भार चांदी.चोरीला गेली होती रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रावेर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले जितेंद्र खैरे हा फिर्यादिचा मूलगाच आरोपी निघाला आहे.पोलिसांनी त्याच्याकडून पन्नास हजराचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले न्या राठोड यांनी एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिल्यावर लपून ठेवलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक मनोहर जाधव, पो ना नितीन डांबरे, पो कॉ महेश मोगरे, पो कॉ जगदीश पाटील , पो कॉ प्रमोद पाटील, पो कॉ सुरेश मेढे, पो कॉ सुकेश तडवी, पो कॉ विशाल पाटील हे तपास करीत आहे.