जामनेर प्रतिनिधी | कोरोना आजाराची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसरी लाट येऊ नये यामुळे आपण येणाऱ्या दसरा व नवरात्र उत्सव दुर्गा मंडळांनी शासनाचे सर्व नियम पाळून साजरे करावे असे आवाहन दुर्गा मित्र मंडळ पद अधिकारी यांच्या बैठकीत बोलताना केले.
जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील दुर्गा मित्र मंडळच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुनील माळी, तुषार पाटील, निलेश घुगे, रियाज शेख, योगेश महाजनआदी उपस्थित होते. जामनेर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक किरण शिंदे उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक यांनी बैठकीत सांगितले की, कोरोना आजाराची दुसरी लाडझरी संपली, मात्र आपण सर्वांनी नवरात्र उत्सव साजरा करताना शासनाचे नियम पाळावे ज्याप्रमाणे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यासारखे कार्यक्रम यासारखे सामाजिक उपक्रम राबवावे. ‘ब्रेक द चेन’ उपक्रमासाठी गर्दी टाळावी. सार्वजनिक दुर्गा मित्र मंडळ यांनी रीतसर परवानगी घ्यावी परवानगीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी. दुर्गा मंडळाने मूर्तीची सजावट साध्या पद्धतीने करावी, दुर्गा मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळासाठी चार फूट व घरगुती साठी दोन फूट असावी, दुर्गा मुर्ती शाडू मातीची असावी ती घरच्या घरी विसर्जन करावे अन्यथा प्रशासनाच्या मूर्ती संकलन केंद्रावर विसर्जन साठी देण्यात यावे, माझे कुटुंब माझी जबाबदारी या महिन्याच्या जास्तीत जास्त प्रसार करावा, गरबा दांडिया या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये त्या व्यतिरिक्त स्वच्छता अभियान व सामाजिक उपक्रम राबवावे अशाप्रकारे शासनाचे आदेश असून शासनाच्या नियमाचे पालन करूनच नवरात्र उत्सव साजरा करावा असे आव्हान दुर्गा उत्सव मित्र मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे